इर्शाळवाडी ग्रामस्थांचं तात्पुरतं पुनर्वसन! नडाळ मंदिरात केली राहण्याची व्यवस्था

इर्शाळवाडी ग्रामस्थांचं तात्पुरतं पुनर्वसन! नडाळ मंदिरात केली राहण्याची व्यवस्था

| Updated on: Jul 22, 2023 | 10:05 AM

इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकनाथ शिंदे यांनी सिडकोतर्फे या ग्रामस्थांना पक्की घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान या ग्रामस्थांची तात्पुरती राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नडाळ पंचायत मंदिरात करण्यात आली आहे.

रायगड, 22 जुलै 2023 | इर्शाळवाडीवर डोंगर कोसळला आणि होत्याचं नव्हत झालं. आता पर्यंत या दुर्घटनेत 22 जणांचे मृतदेह सापडले असून 119 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. इर्शाळवाडीत दुसऱ्या दिवशीही मदतकार्य सुरुच होतं.या दुर्घटनेतून ग्रामस्थ अजूनही सावरलेले नाही आहेत. दरम्यान या ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकनाथ शिंदे यांनी सिडकोतर्फे या ग्रामस्थांना पक्की घरे बांधून देणार असल्याची घोषणा केली आहे. या ग्रामस्थांची तात्पुरती राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नडाळ पंचायत मंदिरात करण्यात आली आहे.

 

Published on: Jul 22, 2023 10:05 AM