Tenth, twelfth result : बारावीचा निकाल 10 जून तर दहावीचा निकाल 20 जूनला लागण्याची शक्यता
दहावी, बारावीच्या निकालाबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी हाती आली असून, बारावीचा निकाल 10 जूनला तर दहावीचा निकाल हा 20 जूनला लागण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे सावट होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी यंदा प्रथमच दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा झाल्या. परीक्षा सुरळीत पार पडल्या, मात्र आता निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसोबतच पालकांचे देखील लक्ष लागले आहे. दहावी, बारावीच्या निकालाबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी हाती आली असून, बारावीचा निकाल 10 जूनला तर दहावीचा निकाल हा 20 जूनला लागण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.
Latest Videos