टेस्लाची भारतात दमदार एंट्री; 'या' शहरात घेतलं भाडेतत्वावर कार्यालय

टेस्लाची भारतात दमदार एंट्री; ‘या’ शहरात घेतलं भाडेतत्वावर कार्यालय

| Updated on: Aug 03, 2023 | 11:06 AM

इलेक्ट्रॉनिक वाहन बनवणारी जागतिक कंपनी टेस्ला आता भारतात येण्यासाठी उत्सुक आहे. कंपनी भारतात मोठ्या गुंतवणुकीच्या तयारीत आहे. कंपनीचा सीईओ आणि मालक एलॉन मस्क याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तशी ग्वाही पण दिली.

पुणे, 03 ऑगस्ट 2023 | इलेक्ट्रॉनिक वाहन बनवणारी जागतिक कंपनी टेस्ला आता भारतात येण्यासाठी उत्सुक आहे. कंपनी भारतात मोठ्या गुंतवणुकीच्या तयारीत आहे. कंपनीचा सीईओ आणि मालक एलॉन मस्क याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन तशी ग्वाही पण दिली. याचवेळी टेस्लाने देशातील पहिले कार्यालय पुण्यातील विमाननगरमध्ये भाडेतत्वावर घेतल्याचे समोर आले आहे. टेस्लाची भारतातील उपकंपनी इंडिया मोटार अँड एनर्जीने विमाननगरमधील पंचशील बिझनेस पार्कमध्ये 5 हजार 850 चौरस फुटांचे कार्यालय भाडेतत्वावर घेतले आहे.

Published on: Aug 03, 2023 11:06 AM