TET Scam : टीईटी घोटाळा प्रकरणात मोठी बातमी, अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द?
हा घोटाळा परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीमध्ये घोटाळा (TET Scam) प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. आधीच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलंय. यामुळे टीईटीची तयारी करणाऱ्यांवर याचा विपरित परिणाम झालेला असताना गुन्हा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहे. यामुळे माजी मंत्री महोदयांचं नाव समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देखील केली जातेय. परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा गैरप्रकार झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी ईडीकडून (ED) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.