आळंदीतील वारकऱ्यांवरील लाठीचार्जचा ठाकरे गटाकडून निषेध!

आळंदीतील वारकऱ्यांवरील लाठीचार्जचा ठाकरे गटाकडून निषेध!

| Updated on: Jun 12, 2023 | 1:47 PM

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला.

मुंबई: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात आला आहे. आळंदीतील वारकऱ्यांवरील लाठीचार्जचा मुंबईत ठाकरे गटाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. वारकऱ्यांवर हल्ला करणारे हेच का मिंधे-फडणवीसांचे हिंदूत्व? असा सवाल आंदोलकाकडून विचारण्यात आला आहे.

Published on: Jun 12, 2023 01:47 PM