Ashish Shelar | ठाकरेंनी पवारांनाही भेटायला वेळ दिला नाही, आशिष शेलार यांनी काढला चिमटा
Ashish Shelar | सध्या राष्ट्रवादी आणि भाजपमधून विस्तव ही जात नाहीये. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करत आहेत.
Ashish Shelar | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचा उपरोधिक टोला हाणल्यानंतर आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सुप्रिया सुळे यांच्या आरोपाचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या काळात दस्तूरखुद्द शरद पवार यांनाही दोन तीन वेळा भेटण्याची वेळ देण्यात आली नव्हती, असा आरोप त्यांनी केला. सुळे यांनी ही बाब आठवावी असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे हे काय सोन्याचे मुख्यमंत्री होते का? असा टोला ही त्यांनी लगावला. सुप्रिया सुळे यांनी राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याचा टोला हाणला होता. एक दौरे करायला आणि एक काम करायला, असा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर आता भाजपकडून तिखट प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.