चित्रा वाघ यांची सध्याची स्थिती…कहीं पे निगाहें कहीं पे… सारखी : सुषमा अंधारे
उर्फी जावेद आणि वाघ यांचा वाद विकोपाला गेला आहे. त्यातच आता या वादात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे.
मुंबई : राज्यात भरीस भर म्हणून अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या वादाची भर पडली आहे. सध्या उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद विकोपाला गेला आहे. त्यातच आता या वादात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. तसेच यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली.
चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना, महिला आयोगाला दिवाणी न्यायालयाचा दर्जा आहे, आयोगाला केराची टोपली दाखवली जाते. पण बिनकामी बाईला तुम्ही खडसावलं का नाही? असा प्रश्न विचारत अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला.
याचबरोबर चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवताना, चित्रा वाघ यांना महिला आयोगाच अध्यक्ष व्हावं असं वाटतं असावं. त्यामुळेच त्या उर्फी जावेदच्या खांद्यावर बंदुक ठेवून हल्ला करत आहेत. भाजपमध्ये सध्या त्यांना मंत्रीपद किंवा आमदारकी मिळणार नाही. म्हणूनच हा खटाटोप त्यांचा सुरू आहे.