‘देवेंद्र फडणवीस शब्द पाळत नाहीत? आयुष्यभर म्हणणारे काय करताय तुम्ही?’, कुणी केलीय सडकून टीका
येथे विविध ठिकाणी त्यांच्या सभा होणार असून त्या तीन महिन्यांत तिसऱ्यांदा अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्या अमरावती मतदारसंघातून निवडूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या अमरावती दौऱ्यावर आहेत. येथे विविध ठिकाणी त्यांच्या सभा होणार असून त्या तीन महिन्यांत तिसऱ्यांदा अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्या अमरावती मतदारसंघातून निवडूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याचदरम्यान त्यांनी सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाना साधला आहे. यावेळी अंधारे यांनी फडणवीस हे त्यांचाच शब्द पाळत नाहीत. कारण याच्या आधी त्यांनी मी ब्रम्हचारी राहीन पण राष्ट्रवादीबरोबर युती नाही नाही असं म्हटलं होतं. पण आता काय करताय असा सवाल केला आहे. तर सोमय्या यांचा गेम त्यांच्यात पक्षातील त्यांच्याच लोकांनी केला असेही त्या म्हणाल्या. कारण तो सगळ्यांच्या मागे ईडी लावतो. त्यामुळे तुझीच माणसं सीडी घेऊन बसलेत असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. तर जे फडणवीस आपला शब्द पाळत नसतील तर शिंदेच मुख्यमंत्री राहणार हे कशावरून? ते शब्द पाळतील हे कशावरून? तर एक म्हणतोय, ३० तारखेपर्यंत आणखीन एक गौप्यस्फोट होईल? आता हा कोणता असेल? की त्याचा नेता खाली पाय उतार होऊन अजित पवार हे मुख्यमंत्री होतील. हे काही सांगता येत नाही.