“भाजप आता एकनाथ शिंदे यांना हातरुमालासारखं वापरून फेकणार,” ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची संतप्त प्रतिक्रिया
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. या सर्व गोंधळावर आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव: शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. राष्ट्रवादीच्या 30 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. या सर्व गोंधळावर आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपचे हे गलिच्छ राजकारण असून तोडा फोडा आणि राज्य करा ही भाजपची नीती आहे. भाजप आता एकनाथ शिंदे यांना हातरुमालासारखं बाहेर फेकणार, तसंच शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसला फोडून त्यांनाही शुद्ध करा,” अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
Published on: Jul 03, 2023 08:52 AM
Latest Videos