Sushma Andhare : गद्दारी केली हे मात्र नक्की, मग कशासाठी?; सुषमा अंधारेंचा शिंदे गटावर निशाना
तर रडण्याचं, बंड करण्याचं किंवा ते 40 आमदार फुटण्याचं एकच कारण केंद्रीय तपास यंत्रणा. याचवरून मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं
चंद्रपूर : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘मातोश्री’ रडले होते. तर ते 40 आमदार देखिल फक्त पैसा आणि स्वत:ची जागा वाचवण्यासाठी तिकडे गेलेत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तर रडण्याचं, बंड करण्याचं किंवा ते 40 आमदार फुटण्याचं एकच कारण केंद्रीय तपास यंत्रणा. याचवरून मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. त्यावरून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटावर निशाना साधला आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच भाजपची नितीच तशी असल्याचा आरोप केला. आमच्या सोबत आलात तर आम्ही तुम्हाला वॉशिंगमशीन मधून धुवून काढून आणि दोष मुक्त करू. पण तुम्ही जर आमच्या सोबत नाही आलात तर जेलमध्ये टाकू असे भाजपचे कित्येक उदाहरण स्पष्ट करता येतील असेही त्या म्हणाल्या.