शरद पवार यांना मविआतून डच्चू? अमोल मिटकरी म्हणतात, ‘नाना काय बोलले?’
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरून मविआत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यामुळे उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी बैठक घेत निर्णय घेतला आहे. तर मविआत आता राष्ट्रवादीबाबात निर्णय घेताना प्लॅन बी तयार करण्यात आला आहे.
मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | अजित पवार यांनी राष्ट्रावादी काँग्रेसशी फारकत घेतली. काका शरद पवार यांच्यावर टीका करत स्वत: बाहेर पडले. सोबत ३० एक आमदार ही नेले आणि थेट पक्षावरच आपला हक्क सांगितला. यानंतर त्यांनी ४५ दिवसात चार वेळी शरद पवार यांची भेट घेतली. यामुळे राज्यातील जनतेसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मविआत देखील संभ्रम निर्माण झाला. त्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दोन बैठका घेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना मविआतून डच्चू देण्याचे ठरवल्याचे कळत आहे. तर शरद पवार यांनी आपली भूमिका बदलली तर आगामी निवडणूका त्यांच्याशिवायचं सामोरे जाणार असून याबाबत प्लॅन बी तयार असल्याचं बोललं जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते अमल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत बोलताना, ठाकरे गट बैठका घेत असतील तर त्यांच्या बैठका आहेत. काँग्रेस शिवसेनेने एकत्र लढावं की स्वतंत्र लढावं हा त्यांचा प्रश्न आहे. नाना काय बोलले याकडे पाहणे गरजेचं नाही, प्रत्येक पक्षाला आढावा घेण्याचा अधिकार आहे. जनतेला जे योग्य वाटत ते जनता निवडून देणार, त्यांना जिथे योग्य वाटत तिथे उमेदवार उभे करावेत असा टोला त्यांनी लागवला आहे. तर मी अजित पवार गटाचा असून यावर मी प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटतं नाही असेही ते म्हणालेत.