मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | मुंबईतील व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमावर ठाकरे गटानं जोरदार हल्लाबोल केला आहे. व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गुलामासारखं जावं लागतं. इथे व्हायब्रंट महाराष्ट्राचा जीव काढून गुजरातला पाठवला जातोय. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाचार आणि गुलाम बनून व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जातात. हाच का तुमचा अंगार? असे म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे. तुमच्या गळ्यात एक पट्टा बांधलाय भंगार असे म्हणत राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका करत घणाघात केला आहे. संजय राऊत यांनी यांनी केलेल्या या टीकेवर राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटातील नेते यांनी प्रत्युत्तर दिलंय. कुठलाही प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलेला नाही तर खोटं बोलायचं आणि तेपण रेटून बोलायचं अशी चांगली यंत्रणा विरोधकांकडं असल्यानं खोटं बोलत आहेत. याला आम्ही विकासात्मक आणि उद्योग आणून उत्तर देतोय, असे उदय सामंत म्हणाले.