बाळासाहेबांची पुण्याई सोडली तर काय आहे तुमच्याकडे; शिंदेंचा ठाकरेंना सवाल
यावेळी शिंदे यांनी, ठाण्यामध्ये काल फस्टेशन पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी सर्व मर्यादा सोडल्या. सत्ता गेल्यानंतर काय परिस्थिती होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवतं होतं असा टोला लगावला आहे
ठाणे : ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला मारहाण झाल्यानंतर भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार लागली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी फडतूस म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या या टीकेला शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी शिंदे यांनी, ठाण्यामध्ये काल फस्टेशन पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी सर्व मर्यादा सोडल्या. सत्ता गेल्यानंतर काय परिस्थिती होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवतं होतं असा टोला लगावला आहे. तर गुंडागर्दी बद्दल बोलताना, तुमच्या काळात दोन मंत्री जेलमध्ये गेले गृहमंत्री जेलमध्ये गेले. कोणी विरोधात बोललं तर त्याला जेलमध्ये टाकलं गेलं. ही गुंडागर्दी ते विसरलेत का? जेव्हा ते मुख्यमंत्री होते असा सवाल केला आहे. तर वडिलांची पुण्याई बाळासाहेबांची पुण्याई नाव सोडलं तर काय आहे तुमच्याकडे असा सवाल त्यांनी केला आहे.