“तुमच्या राजवटीत हिंदू खतरे में असेल तर…”, सामनातून शिंदे गट आणि भाजपवर टीकास्त्र
आज सामनातून पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. "तुमच्या राजवटीत हिंदू खतरे में असेल तर तुम्ही सत्ता चालवायला नालायक आहात!" या शीर्षकाखाली सामनातून शिवसेनेवर आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे.
मुंबई : आज सामनातून पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेवर आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. “तुमच्या राजवटीत हिंदू खतरे में असेल तर तुम्ही सत्ता चालवायला नालायक आहात!” या शीर्षकाखाली सामनातून शिवसेनेवर आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. “विश्वगुरू इतका ताकदवान नेता सत्तेत बसल्यानंतरही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ‘हिंदू खतरे में’ असेल, तर तुम्ही सत्ता चालवायला नालायक आहात, असा घणाघात करत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर दांडपट्टय़ाचे वळ उमटवले. शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन… दणदणीत, सणसणीत आणि खणखणीत झाला. येथे निष्ठावंत, कडवट शिवसैनिकांची गर्दी उसळली आहे आणि तिकडे वसुलीबाज गारदी जमले आहेत, असा आसूड ओढत शिवसेनेतून कुणीतरी गेलं म्हणून शिवसेनेला धक्का वगैरे बसत नाही. शिवसेना धक्काप्रूफ आहे, असा उल्लेख सामनातून करण्यात आला आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
