काकारे, मामारे करत रडण्यापेक्षा, अजित पवार यांनी अंधारेंना का फटकारलं? विचारलं कुठल्या पक्षाच्या?
त्यांनी भावूक होत पवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबाबदत तक्रार केली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता असं म्हटलं होतं.
मुंबई : साताऱ्यातील कार्यक्रमात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शरद पवारांसमोर भाषण केलं. त्यावेळी त्यांनी भावूक होत पवार यांच्याकडे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar) यांच्याबाबदत तक्रार केली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावरील अश्लाघ्य वक्तव्याविरोधातील तक्रार का नोंदवली नाही असा प्रश्न विचारायला हवा होता असं म्हटलं होतं. त्यावरून वराच गोंधळ झाला असून आता यावरूनच अजित पवार यांनी अंधारे फटकारलं आहे. तसेच सुषमा अंधारे कुठल्या पक्षाच्या आहेत असा सवालच उपस्थित केला. तर त्या ठाकरे गटाच्या असून त्यांचा विधान परिषदेत विरोधी पक्षनेता आहे. पवारांसमोर रडण्यापेक्षा, तिथे भावनिक होण्यापेक्षा ते ज्या पक्षाचे काम बघतायेत, काकारे, मामारे करत ज्या पक्षासाठी भाषण करतात त्याच्याकडे तक्रार करा. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सांगा, उद्धव ठाकरेंसमोर रडला असता आणि अंबादास दानवेंना मुद्दा उपस्थित करायला सांगितला असता तर योग्य ठरले असते असं म्हटलं आहे.