मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेनं घेतलं शिवसेनेचं धनुष्यबाण हाती

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेनं घेतलं शिवसेनेचं धनुष्यबाण हाती

| Updated on: Jun 02, 2023 | 9:37 AM

VIDEO | मुंबई पूर्व उपनगरात उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोसळणार? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढणार?

मुंबई : दिवसेंदिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आहे. गुरूवारी अश्विनी माटेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. अश्विनी माटेकर यांच्यासह मुंबईीतील चांदिवलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला. सध्या शिवसेना पक्षात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी आता प्रवेश करण्यात सुरूवात केली आहे. दोनच दिवसांपूर्वी चांदिवली विधानसभेतील अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून आलेल्या परंतु शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Published on: Jun 02, 2023 09:37 AM