‘… आमच्या भगिनीला मिर्ची लागली’, राहुल गांधी फ्लाईंग किस प्रकरणावरून ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा निशाणा

| Updated on: Aug 10, 2023 | 4:55 PM

VIDEO | 'किरीट सोमय्यांच्या 'त्या' प्रकरणावर स्मृती इराणी काहीच बोलल्या नाहीत', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा स्मृती ईराणी यांच्यावर हल्लाबोल

औरंगाबाद, १० ऑगस्ट २०२३ | भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला. हा महिलांचा अपमान आहे. महिला खासदारांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी मागणीच स्मृती ईराणी यांनी केली आहे. राहुल गांधी यांची फ्लाईंग किस देण्याची कृती चुकीचं असल्याचं सांगत भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेऊन याबाबतची तक्रार केली आहे. तर एक महिला विरोधी व्यक्तीच महिला खासदारांना फ्लाईंग किस देऊ शकतो. असा प्रकार यापूर्वी कधी पाहिला नाही. यावरून ते महिलांबाबत काय विचार करतात हे दिसून येतं. ही अभद्र आणि आक्षेपार्ह कृती आहे, अशी टीका स्मृती ईराणी यांनी काल केली आहे. स्मृती इराणी यांनी केलेल्या या टीकेवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हल्लाबोल केलाय. राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी यांनी नुसतं प्लाईंग किस दिल तर आमच्या भगिनीला मिर्ची लागली आणि किरीट सोमय्या यांच्या त्या घाण प्रकरणावर त्या काहीच बोलल्या नाही, असे म्हणत स्मृती ईराणी यांच्यावर हल्लाबोल केला.

Published on: Aug 10, 2023 04:54 PM
‘संभाजी भिडे यांची हिंमत नाही, त्यांचा बोलविता धनी…’, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचा आरोप कुणावर?
राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किसच्या वादात हेमा मालिनी यांची उडी; म्हणाल्या, ‘मी राहुल गांधी यांना…’