बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरचा राडा ठरवून, शिंदेंच्या शिवसेनेवर कुणाचा गंभीर आरोप?

| Updated on: Nov 17, 2023 | 1:52 PM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जोरदार राडा झाला. यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आलेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील राड्यावर मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य करत गंभीर आरोप केला.

Follow us on

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२३ : दादरच्या शिवाजी पार्क येथे असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील राड्यावर मुंबईच्या माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाष्य केले आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर झालेला कालचा राडा हा ठरवून झालेला आहे, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. स्मृतीस्थळावर येऊन शिंदे गटाविरोधात घोषणा बाजी केली असा शिंदे गटाने आरोप करत टीका केली. तर या टीकेवर प्रत्युत्तर देताना सर्वात पहिले कुणी घोषणाबाजी केली, राडा कुणी केला, हे तपासून घ्यावे, असे म्हणत कालचा राडा हा ठरवून झाला असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.