‘…पण सरकारला शहानपण आलं, श्वेतपत्रिकेवरून ठाकरे गटाचा नेता भडकला’
याचदरम्यान विरोधकांनी प्रकल्पावर सरकारला अधिवेशनात लेक्ष केलं. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत लवकरच श्वेत पत्रिका काढू असे जाहीर केलं.
मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | राज्यातून गेल्या वर्ष भरात अनेक महत्त्वाचे प्रकल्प हे राज्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे एक वर्षापासून शिंदे-फडणवीस सरकारवर होत आहे. त्यानंतर आता या सरकारमध्ये अजित पवार गट देखील सामिल झाला आहे. याचदरम्यान विरोधकांनी प्रकल्पावर सरकारला अधिवेशनात लेक्ष केलं. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत लवकरच श्वेत पत्रिका काढू असे जाहीर केलं. त्यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार सचिन अहिर यांनी टीका केली आहे. त्यांनी, या सरकाला एका वर्षांनंतर शहानपण आलं का असा सवाल केला आहे. तर उद्योग मंत्री हे मागच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते. त्यामुळे त्या काळात किती उद्योग राज्य बाहेर गेले हे त्यांना सुद्धा माहिती आहे. परंतु आत्ता यांचं सरकार आल्यापासून हजारो कोटींचे प्रकल्प हे राज्याबाहेर गेले आहेत. त्याची देखील यादी त्यांनी वाचून दाखवली पाहिजे. आता उद्योगमंत्री शहाणपण सांगत आहेत असा टोला लगावला आहे.