‘बेकायदेशीर पोलिस भरती हेच या महाराष्ट्र आणि मुंबईचं दुर्दैव’; ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर हल्लाबोल

‘बेकायदेशीर पोलिस भरती हेच या महाराष्ट्र आणि मुंबईचं दुर्दैव’; ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Jul 26, 2023 | 8:58 AM

एकेकाळी मुंबई आणि महाराष्ट्र पोलीसांच्या लौकिकतेती तुलना जगातील मुख्य पोलिस दलाशी केली जात असताना याच पोलीस दलात तुम्ही कंत्राटी पोलीसांची भरती करताय? असा सवाल केला आहे.

मुंबई | 26 जुलै 2023 : कंत्राटी पोलिसांची भरतीवरून राज्यातील राजकराण तापतं आहे. यावरून विरोधकांकडून आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका होत आहे. पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन गृह खात्याने हा निर्णय घेतला आहे. तर या भरतीने मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केलीय. यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे नेते आमदार सुनील प्रभू यांनी देखील सरकारचा खरपूस समाचार घेत टीका केली आहे. त्यांनी, बेकायदेशीर पोलिस भरती हेच या महाराष्ट्र आणि मुंबईचं दुर्दैव आहे. एकेकाळी मुंबई आणि महाराष्ट्र पोलीसांच्या लौकिकतेती तुलना जगातील मुख्य पोलिस दलाशी केली जात असताना याच पोलीस दलात तुम्ही कंत्राटी पोलीसांची भरती करताय? असा सवाल केला आहे. तर महत्वाची बाब म्हणजे जे पोलीस जबाबदाऱ्या पार पाडतात ते हे कंत्राटी पोलीस पार पाडणार का? जर कंत्राटी पोलीसाने एखादी चुकिची गोष्ट केली तर त्याला कोण जबाबदार? असा खोचक सवाल देखील त्यांनी सरकार आणि गृह विभागाला केलाय. तसेच पोलीस खात्याची गरिमा घालवण्याचे काम हे सरकार करतयं. शेवटी या सरकारकडून काय अपेक्षा करणार. बेकायदेशिर हे बेकायदेशिर काम करणार असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

 

Published on: Jul 26, 2023 08:58 AM