कोल्हापुरातील तणावपुर्वक परिस्थितीवर काय म्हणाले राऊत? कोणाला म्हणाले पाकिस्तानात चालते व्हा?

कोल्हापुरातील तणावपुर्वक परिस्थितीवर काय म्हणाले राऊत? कोणाला म्हणाले पाकिस्तानात चालते व्हा?

| Updated on: Jun 07, 2023 | 4:10 PM

आज कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आणि पोलीसांच्यामध्ये चकमक उडाली. पोलीसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराचा वापर केला आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असलीतरिही शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी विशिष्ट घरे, दुकानांवर दगडफेक झाली.

छ. संभाजीनगर : राज्यातील काही भागात गेल्या काही महिन्यांपासून दंगलसदृश्य परिस्थिती पहायला मिळत आहे. ज्यामुळे जातीय तेढ निर्माण होताना दिसत आहेत. तर आज कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आणि पोलीसांच्यामध्ये चकमक उडाली. पोलीसांनी लाठीचार्ज करत अश्रूधुराचा वापर केला आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असलीतरिही शिवाजी चौक येथील गंजी गल्ली परिसरात काही आंदोलकांनी विशिष्ट घरे, दुकानांवर दगडफेक झाली. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट आणि कठोर शब्दात यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी राज्यातील काही भागात दंगलसदृश्य परिस्थिती आहे. कोल्हापुरात जमावबंदी लागू आहे. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना उतरल्या. हा तणाव कोण निर्माण करत आहे. जे औरंगजेबाचे भक्त असतील, फोटो नाचवत असतील तर त्यांना देशात राहण्याचा हक्क नाही. त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं. ज्यांनी स्टेट्स ठेवला असेल त्यांच्यावर कारवाई करा. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.

Published on: Jun 07, 2023 04:10 PM