वाराणासीची निवडणूक मोदी यांना जड जाईल? राऊत यांनी नेमकं कारण काय सांगितलं?
तर त्यांनी तेथे लोकसभा निवडणुकीत उतरावे अशीच सर्वांची इच्छा देखील आहे. आणि जर असे झालेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2024 ची लोकसभा निवडणूक ही सोपी नाही. त्यांना वाराणासीतून जिंकणं कठिण जाईल असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी वाराणासीतून निवडणूक लढवतील अशा बातम्या काही दिवसांपुर्वी आल्या होत्या. तर त्यांनी तेथे लोकसभा निवडणुकीत उतरावे अशीच सर्वांची इच्छा देखील आहे. आणि जर असे झालेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2024 ची लोकसभा निवडणूक ही सोपी नाही. त्यांना वाराणासीतून जिंकणं कठिण जाईल असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. तसेच सध्या मोदी हे वाराणासी आणि गुजरातमधून निवडणुकीला समोरे जाण्याचा विचार करत आहेत. पण वाराणासीतून प्रियंका गांधी यांचा त्यांना कडवा विरोध पहावा लागेल. तर प्रियंका गांधी यांच्या विरोधात निवडणूक जिंकणं तितकं सोपं राहणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. तर दिल्लील असल्याने राष्ट्रीय राजकारण पाहत असतो. देशाचे राजकारण हे पुर्णपणे बदलत आहे. राहुल गांधी यांच्यामागे देश उभा राहतोय यातूनच भाजपच्या नेत्यांमध्ये चिडचिड होत आहे अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे.