‘गावच्या जत्रेमधील तंबू म्हणजे शिवसेना’; शिंदे गटावर राऊत यांची टीका
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्धापन दिनाचा कार्यक्रम जाहीर केला असून गोरेगाव इथल्या नेक्से एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच्या आधी आता याच वर्धापन दिनाचा टीझर शिवसेनेने रिलीज केला आहे. या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत.
मुंबई : शिवसेनेतील सर्वात मोठी बंडखोरीनंतर शिंदे गटाचा पहिलाच तर शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन 19 जून रोजी साजरा होणार आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्धापन दिनाचा कार्यक्रम जाहीर केला असून गोरेगाव इथल्या नेक्से एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याच्या आधी आता याच वर्धापन दिनाचा टीझर शिवसेनेने रिलीज केला आहे. या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो दाखवण्यात आले आहेत. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. जाहिरातीत जे लोक बाळासाहेब ठाकरे यांना विसरले. ते आता टीझर दाखवत आहेत, असा घणाघात राऊत यांनी शिंदे गटावर केला आहे. तसेच त्यांनी शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जूनला आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. ते शिवसेनेच्या वर्धापन दिनाला संबोधित करणार आहेत. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका करताना, गावच्या जत्रेत तंबू असतो त्या तंबूत खोटा चंद्र असतो. खोटी मोटारसायकल असते. लोक चंद्र पाहून फोटो काढतात. तशी ही खोटी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना आहे.