'शिवसेना तुमची आहे ना तर..., कशाला दिल्लीवाऱ्या करता?, राऊतांचा शिंदे यांना टोला; फडणवीस यांच्यावरही टीका

‘शिवसेना तुमची आहे ना तर…, कशाला दिल्लीवाऱ्या करता?, राऊतांचा शिंदे यांना टोला; फडणवीस यांच्यावरही टीका

| Updated on: Jun 05, 2023 | 11:46 AM

बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कधीही दिल्लीवाऱ्या केल्या नाहीत. युतीत सत्तेत असतानाही उद्धव ठाकरे फार-फार दोन वेळेला दिल्लीला गेले असतील. मात्र, एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्ली वाऱ्या कराव्या लागत आहे.

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीवरून सध्या राज्यात चर्चा सुरू आहेत. तसेच आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असही बोललं जात आहे. यावरूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कधीही दिल्लीवाऱ्या केल्या नाहीत. युतीत सत्तेत असतानाही उद्धव ठाकरे फार-फार दोन वेळेला दिल्लीला गेले असतील. मात्र, एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्ली वाऱ्या कराव्या लागत आहे. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करू द्या, असा अर्ज घेऊन त्यांना दिल्ली दरबारात उभं राहावं लागतं. तुम्ही म्हणताना की शिवसेना तुमची तर मग रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार आहे का हिंमत? असा सवाल केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधताना दिल्ली त्यांच्यासाठी मक्का-मदिना आहे. ते मी समजू शकतो. मात्र, एकनाथ शिंदेंचे काय? ते वारंवार दिल्लीला का धाव घेताहेत. हे फारच विचित्र असल्याचा टोला राऊत यांनी लगावला आहे.

Published on: Jun 05, 2023 11:46 AM