‘…तर पुन्हा निधीवरून न्यायालयात जाणार’; ठाकरे गटाच्या आमदाराचा सरकारला इशारा
मागिल महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार हेच अर्थमंत्री होते. त्यावेळी देखील त्यांच्यावर निधी वाटपावरून टीका आणि आरोप करण्यात आले होते. त्यादरम्यान तत्कालिन शिवसेना पक्षाचे आणि आता ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे निधी वाटपावरून न्यायालयात गेले होते.
मुंबई | 25 जुलै 2023 : अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा २०१९ चा वाद पुन्हा एकदा इतिहास बनून समोर येत आहे. मागिल महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार हेच अर्थमंत्री होते. त्यावेळी देखील त्यांच्यावर निधी वाटपावरून टीका आणि आरोप करण्यात आले होते. त्यादरम्यान तत्कालिन शिवसेना पक्षाचे आणि आता ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे निधी वाटपावरून न्यायालयात गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार हे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये अर्थमंत्री आहेत. यावेळी देखील त्यांनी पुरवणी मागण्यांमध्ये 1500 कोटींच्या निधीची तरतूद करताना राष्ट्रवादी, शिंदे गटाच्या आमदारांना निधी दिला. मात्र त्यांना शरद पवार गट, काँग्रेस आणि ठाकरे गटातील आमदारांचा विसर पडला. त्यावरून आता पुन्हा एकदा आमदार वायकर हे निधी वाटपावरून न्यायालयात जाण्याच्या तयारीत दिसत आहेत. यावरून त्यांनी, निधी वाटपावरून मी अगोदरच न्यायालयात गेलेलो आहे. आता निधी देताना आम्हाला निधी दिलेला नाही, जिल्हा नियोजन विकास निधी मिळावा म्हणून पत्र मागवली होती. ती पत्र दिली होती. मात्र निधी मिळाला तो अडीच कोटी आणि जे बेडकासारखे उड्या मारून गेलेत त्यांना तुम्ही ३५ कोटी ४० कोटींचा निधी देत आहेत असा घणाघणात केला आहे. त्यामुळे पुन्हा निधीवरून न्यायालयात जाण्याचा विचार सध्या करत असल्याचं देखील वायकर यांनी सांगताना सरकारला इशारा दिला आहे.