लोढा यांच्या कार्यालयावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा टोला, ‘दुर्दैवाने, त्या कार्यालयात कार्यकर्ते माजी नगरसेवक’
तर याच कार्यालयावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी लोढा यांच्यासह भाजपला ते कार्यालय २४ तासात मोकळं करण्याचा इशारा दिला आहे. त्याचदरम्यान आता हे कार्यालय भाजपच्या मुंबईतील माजी नगरसेवकांना देण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मुंबई | 25 जुलै 2023 : मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे मुंबई महापालिकेत कार्यालयावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. या कार्यालयावरून भाजप विरूद्ध ठाकरे गट असा वाद रंगला आहे. तर याच कार्यालयावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी लोढा यांच्यासह भाजपला ते कार्यालय २४ तासात मोकळं करण्याचा इशारा दिला आहे. त्याचदरम्यान आता हे कार्यालय भाजपच्या मुंबईतील माजी नगरसेवकांना देण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यावरून आता ठाकरे गटाकडून विरोध होत आहे. पालकमंत्र्यांचे हे कार्यालय भाजपच्या माजी नगरसेवकांना देण्यात आल्यावरून ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी टोला लगावला आहे. तसेच टीका करताना, महापालिकेत आता बॉडी नसल्यामुळेच हे कार्यालय करण्यात आल्याचे अजित पवार म्हणाल्याचं उल्लेख केला आहे. तर असे असेल तर पुणे, नाशिक, ठाण्यात देखील भाजपकडून कार्यालये उभारा असा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर दुर्दैवाने त्या कार्यालयात कार्यकर्ते माजी नगरसेवक जाऊन बसत आहेत असा टोला लगावला आहे.