शिवसेनेत लवकरच होणार मोठे प्रवेश, कृपाल तुमाने यांनी फोडला बाँब
शिवसेना खासदार कृपाल तुमाणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. "ठाकरे गटाकडे असलेले खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत ठाकरे गटाच्या त्या खासदारांसोबत आमची बैठक झाली, ते शिंदे गटात यायला तयार आहेत. लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाणार आहे", असा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे
नागपूर : शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. “ठाकरे गटाकडे असलेले खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत ठाकरे गटाच्या त्या खासदारांसोबत आमची बैठक झाली, ते शिंदे गटात यायला तयार आहेत. लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाणार आहे”, असा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे. “शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही 13 खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आलो, तेच मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत. ऊर्वरीत लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील”, असंही त्यांनी सांगितलं.तसेच “संजय राऊत इतर पक्षाचे दलाल आहेत. त्यांनी पक्षाचा सत्यानाश केला. तरी उद्धवजी काही बोलत नाहीत”, अशी टीका तुमाणे यांनी केली.
Published on: May 25, 2023 12:58 PM
Latest Videos