‘मणिपूर हिंसाचारावर घटनेवर पंतप्रधान मोदी गप्प का? गृहमंत्री कुठे आहेत?’ राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
संतप्त जमावाने परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घराची नासधूस करण्यासह ते जाळण्याचा प्रयत्न केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई : मणिपूरमध्ये गेल्या तीन एक महिन्यांपासून हिंसाचार होत आहे. आता पुन्हा एकदा येथे हिंसाचाराचा उद्रेक झाला. संतप्त जमावाने परराष्ट्र राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घराची नासधूस करण्यासह ते जाळण्याचा प्रयत्न केला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. केंद्रीय मंत्र्यांचे घर जाळले जातं. लाखो लोक पलायन करत आहेत. मात्र सरकारकडून कारवाई होत नाही. सरकारला हवे तरी काय? मणिपूरला काश्मीर बनवायचे आहे का? असं सवाल करत हे सर्व केंद्रीय गृहमंत्रालयाचे अपयश असल्याचं म्हटलं आहे. तर अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कुठे आहेत असा सवाल केला आहे. एक राज्य जळत असून, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह बोलत नाहीत असा घणाघात केला आहे.