‘मागे फना काढला होता आता ढोंग करताय’; राऊत यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल, दिलं ओपन चॅलेंज
प्रकाश आंबेडकर यांच्यासह ठाकरे गटावर भाजपसह शिंदे गटाने जोरदार टीका केली होती. आताही याच विषयावरून ठाकरे गटाला डिवचण्यात आलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
सातारा : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली होती. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांच्यासह ठाकरे गटावर भाजपसह शिंदे गटाने जोरदार टीका केली होती. आताही याच विषयावरून ठाकरे गटाला डिवचण्यात आलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावरून प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेबाच्या मुद्द्यावर आमची भूमिकाही स्पष्टच असल्याचं म्हटलं आहे. तर मागे जेव्हा काही लोकांनी असंच केलं होतं. त्यावेळी त्यांनी किती मोठा फना काढला होता. पण आता का वेटोळं घालून बसलेत अशी टीका त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. तर ती कबर उखडून टाकू असे म्हणाले होते. मग जा उखडा कबर आहे का हिंमत? आम्ही तुम्हाला देतो, जेसीबी, कुदळ, फावडे देतो असेही सुनावलं आहे. तर फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी बोलावं म्हणावं आंबेडकर यांच्यावर असाही टोला त्यांनी लागवाल आहे.