संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर बुडवलीच सोबत मविआही; शिंदे यांच्या शिवसेना नेत्याचा घणाघात
स्वत: अजित पवार यांनी समोर येत खुलासा केला. तसेच त्यांनी राऊत यांना आमचं वकीलपत्र घेऊ नका अशी समज देखील दिली. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवार कुटुंबियांबद्दल दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात लिहलं आणि एकच खळबळ उडाली. यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादी सोडणार तर ते भाजपमध्ये जाणार अशा वावड्या उठायला सुरूवात झाली. त्यानंतर स्वत: अजित पवार यांनी समोर येत खुलासा केला. तसेच त्यांनी राऊत यांना आमचं वकीलपत्र घेऊ नका अशी समज देखील दिली. त्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर घणाघात करताना, राऊत हे स्वतःच्या बापाला सुद्धा घाबरत नव्हते. म्हणून त्यांनी ते विधान केलं. महाविकास आघाडी डुबवण्याचं काम हे संजय राऊत यांना पुरिपूर्ण केलेलं आहे. त्यातल्या त्यात जी उद्धव ठाकरे यांची आधीची शिवसेना होती ती बुडवण्याचंही काम संजय राऊत यांनी केलं. परंतु आता त्यांनी जे अजितदादांशी पंगा घेतला तो महागात पडू शकतो. कारण हे उद्धव ठाकरे सहन करतील पण अजित पवार सहन करणार नाहीत, असे शिरसाट म्हणाले.