”भाजपच्या तमाशातला नाच्या”, नितेश राणे यांच्यावर कोणी केली खरमरीत टीका?
त्यादरम्यान आता याच टीकेवरून ठाकरे गटाचे युवा सेना नेते शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली आहे. नितेश राणे तुला आई भहिणींची इज्जत जपता येत नाही.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहेत. तिला बघायला लोकांना जसं आवडतं, तसं आपल्यालाही बघायला लोक चॅनल सुरू करतात असं राऊत यांना वाटतं अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली. त्यावरून सध्या चांगलेच राजकारण तापलेलं आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी नितेश राणे यांचा खरपूस समाचार घेत टिका केली होती. त्यादरम्यान आता याच टीकेवरून ठाकरे गटाचे युवा सेना नेते शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली आहे. नितेश राणे तुला आई भहिणींची इज्जत जपता येत नाही. तू दिल्लीत बसलेल्या माकडांच्या जीवावर इकडे तमाशात नाचण्यात काम करतोस. नित्या तू दोन तोंडी मांडूळ आहेस. तू भाजपच्या तमाशातला नाच्या आहेस अशी टीका केली आहे. तर तू जातीवादी असून नको त्या गोष्टी बोलून युवकांची डोकी भडकावतोस. तर किर्तिकर यांना वेळ दिली नाही तर दोन चार वेळा खासदार कसे झाले. हे जरा म्हाताऱ्याला विचार? तुझा बाप नारायण राणे कोंबडी चोर पासून आमदार, खासदार, झाला. त्याला मुख्यामंत्री बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. किती जरी वळवळ केली तरी सत्ता गेल्यावर हे सगळं बंद पडणार असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे.