राऊत यांचा शंभूराज देसाई यांना इशारा; म्हणाले, ‘अहंकार वाढायला लागला की…’
साताऱ्यातच खासदार उदयनराजे भोसले विरूद्ध पालकमंत्री शंभूराज देसाई असा सामना लागला आहे. तर यावरून आठवड्याभरापूर्वी देसाई यांनी आमचे सरकार आहे, आम्ही निर्णय घेऊ असं वक्तव्य केलं होतं.
कराड : पोवई नाका परिसरात होणाऱ्या बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकावरून साताऱ्यातील राजकारण चांगलेच तापलेलं आहे. यावरून साताऱ्यातच खासदार उदयनराजे भोसले विरूद्ध पालकमंत्री शंभूराज देसाई असा सामना लागला आहे. तर यावरून आठवड्याभरापूर्वी देसाई यांनी आमचे सरकार आहे, आम्ही निर्णय घेऊ असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. त्यांनी मी म्हणजे सर्वस्व, मी म्हणजे मालक हे दिल्लीत कधी चाललं नाही, तर गल्लीत काय चालणार असा टोला लगावताना आधी आपल्या आजोबांना लोक लोकनेते का म्हणतात याचा अभ्यास त्यांनी करावा असं म्हटलं आहे. तर येथे कोणी मालक होऊ शकत नाही, येथे लोकशाही आहे. ही लोकशाही दिल्लीत आणि पाटणलाही आहे. त्यामुळे अनेकदा तुम्हाला पराभूत बघावा लागला. परत हा पहावा लागणार असल्याचं म्हटलं आहे. तर मी म्हणजे सरकार आणि राज्य हा अहंकार वाढायला की लोक पाठवतात. पाटणमध्येही अशीच वेळ आल्याचं देखील ते म्हणाले.