पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर राऊत यांची खोचक टीका; ‘त्यांनी मणिपूरमध्ये जावं…’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. तर मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात पवार जाणार असल्याने विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे.
मुंबई, 01 ऑगस्ट 2023 | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. तर मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात पवार जाणार असल्याने विरोधी पक्षांमध्ये नाराजी आहे. यादरम्यान ठाकरे गटाच्या शिवसेनाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनामधून पंतप्रधानांच्या पुणे दौरा आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर टीका करण्यात आली होती. तर पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. यावेळी राऊत यांनी, मोदी हे पुण्यात जाऊ शकतात. ते देशातील कोणत्याही भागात जाऊ शकतात. मात्र ते मणिपूरला जाणार नाही. ते मणिपूर सोडून सगळीकडे जात आहेत. आमचं म्हणणं आहे, त्यांनी मणिपूरमध्ये जावं. असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम

टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले

गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार

सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
