राऊत धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई, एकाला घेतलं ताब्यात, गुन्हा ही नोंद

राऊत धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांची कारवाई, एकाला घेतलं ताब्यात, गुन्हा ही नोंद

| Updated on: Apr 01, 2023 | 2:27 PM

खासदार राऊत यांना धमकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत राऊत यांच्या घरी जात माहिती घेतली होती. तर पुण्यातून राहुल तळेकर या तरुणाला संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आली. यानंतर कांजूरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी जात लॅारेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल केला. याबाबत सुनील राऊत यांनी माहिती दिली.

राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांना, हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू असा हा मॅसेज आला होता. तर दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स तयारी करके रखना, असेही म्हटलं होतं. त्यादरम्यान मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत राऊत यांच्या घरी जात माहिती घेतली होती. तर पुण्यातून राहुल तळेकर या तरुणाला संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे.

Published on: Apr 01, 2023 02:26 PM