सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांच्यासाठी; राऊतांचा तिखट टीका

सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांच्यासाठी; राऊतांचा तिखट टीका

| Updated on: Apr 01, 2023 | 11:27 AM

खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीवरून उद्धव ठाकरे गटाचे नेते विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला करत टीका केली आहे

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आधी ठाण्यातील एका व्यक्तीकडून आणि त्यानंतर आता लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आल्याने सरकारवर आता टीका होताना दिसत आहे. खासदार संजय राऊत यांना आलेल्या धमकीवरून उद्धव ठाकरे गटाचे नेते विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला करत टीका केली आहे. तर संजय राऊत यांनी त्यांना धमक्या येत आहेत. त्यांच्या जीवाला धोका असल्याबाबत कल्पना गृह खात्याला दिली होती. मात्र सरकारनं त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली आहे. त्यानंतर आता राऊत यांनी सरकारला घेरत टीका केली आहे.

राऊत यांनी, निरोधकांना धमक्या येत असतात. पण विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचं सरकार गांभीर्यानं घेत नाही. सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यासाठी लावल्यामुळे महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढेपाळली आहे असा घणाघात त्यांना केला आहे.

Published on: Apr 01, 2023 11:27 AM