Kolhapur Lathicharge : कोल्हापूर शहरात तणाव, पोलीसांचा लाठीचार्ज; ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल

Kolhapur Lathicharge : कोल्हापूर शहरात तणाव, पोलीसांचा लाठीचार्ज; ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Jun 07, 2023 | 1:57 PM

आज हिंदू संघटनांच्या सदस्यांनी याविरोधात निदर्शने केली, त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला ज्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

कोल्हापूर : कोल्हापुरात मंगळवारी काही तरुणांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केली होती, ज्यावरून आता हे प्रकरण वाढत आहे. आज हिंदू संघटनांच्या सदस्यांनी याविरोधात निदर्शने केली, त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला ज्यात अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे. शहरातील संघटनांकडून बंद आणि आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. यादरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट सरकारवर हल्ला चढवला आहे. तर छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीत धार्मिक तणाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय ते सरकारचं अपयश आहे. तर फडणवीस यांच्या स्टेटमेंटवरही त्यांनी टीका करताना तुम्हीच कशाला या राज्यातील कोणच असं सहण करणार नाही. तर जे औरंगजेबचे नाव वापरून राज्याचं वातावरण खराब करत आहेत त्यांचा शोध घेण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

Published on: Jun 07, 2023 01:57 PM