जे असली मातीचे पैलवान असतात तेच…., फडणवीस यांचा राऊतांना टोला
पुढच्या पंधरा दिवसात हे सरकार कोसळेल, सरकारचं डेथ वॉरंट तयार आहे, त्यावर सही व्हायची बाकी आहे, पुष्पचक्र अर्पण करा, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप शिंदे गट युतीतील सरकारवर निशाणा साधला होता
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी 15 दिवसात सरकार कोसळणार असल्याच्या इशारा दिला होता. त्यावेळी राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे भाकीत केले. तसेच सर्व सरकारच भ्रष्ट आहे. पुढच्या पंधरा दिवसात हे सरकार कोसळेल, सरकारचं डेथ वॉरंट तयार आहे, त्यावर सही व्हायची बाकी आहे, पुष्पचक्र अर्पण करा, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप शिंदे गट युतीतील सरकारवर निशाणा साधला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाना साधताना, राऊत यांना नशेत कुस्ती खेळू नका असा सल्ला दिला आहे. तर काही काहीजण सकाळी सकाळी 9 वाजता नशा करुन कुस्ती खेळतात असा टोला लगावला आहे. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बाहेर व्हाव लागतं. तर जे असली मातीतले पैलवान असतात तेच कुस्ती जिंकतात असेही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.
Published on: Apr 24, 2023 08:55 AM
Latest Videos