पुढे पायलट मागे स्कॉड कशासाठी? लोक मारतील म्हणून; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

पुढे पायलट मागे स्कॉड कशासाठी? लोक मारतील म्हणून; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला

| Updated on: Apr 10, 2023 | 11:11 AM

पुढे पायलट मागे स्कॉड, 40-40 पोलिस एका एका गद्दार आमदार आणि खासदाराच्या मागे लावले जात आहेत. जर तुम्ही गद्दार नाही तचर भिती कसली

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी शिंदे गटातील आमदारांना देण्यात आलेल्या सुरक्षेवरूनही निशाना साधला आहे. राऊत यांनी यावेळी या 40 लोकांना इतकी सुरक्षा का दिली जात आहे? असा सवाल करत, पुढे पायलट मागे स्कॉड, 40-40 पोलिस एका एका गद्दार आमदार आणि खासदाराच्या मागे लावले जात आहेत. जर तुम्ही गद्दार नाही तचर भिती कसली. तुम्हाला भिती याचीच आहे की, बाळासाहेंबाचे विचार हे गद्दारांना रस्त्यात मारा हे आहेत. तर जनता तसे करेल म्हणून हे घाबरत आहेत. त्यांच्या मनात भिती आहे.

Published on: Apr 10, 2023 11:11 AM