राऊतांच्या सुरक्षेवरून ठाकरे गटाच्या नेत्याचा सरकारवर निशाना; म्हणाले, राऊत हे स्वत: खंबीर. मात्र
राऊत हे कुठल्याच गोष्टींना डगमगत नाहीत. ते स्वत: खंबीर आहेत. मात्र सरकारने त्याचं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. सरकारची जबाबदारी पार पाडली पाहिजे
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यानंतर यावर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावरूनच ठाकरे गटाचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संजय राऊत यांना राज्य सरकारने संरक्षण दिलं पाहिजे असं म्हटलं आहे. तर राऊतांच्या सुरक्षेमध्ये कमतरता असेल तर ती भरून काढा ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
राऊत हे कुठल्याच गोष्टींना डगमगत नाहीत. ते स्वत: खंबीर आहेत. मात्र सरकारने त्याचं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. सरकारची जबाबदारी पार पाडली पाहिजे. सुरक्षा देणं ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. तर शिवसेनेला धमकी काही नवीन नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ह्या धमक्या येतच होत्या. पण त्या सगळ्या धमक्यांना पुरून उरून शिवसेना उभी असल्याचेही देसाई म्हणाले.