राऊतांच्या कबड्डीवर फडणवीस यांचा कुस्तीचा पलटवार, पहा काय म्हणाले? फडणवीस

राऊतांच्या कबड्डीवर फडणवीस यांचा कुस्तीचा पलटवार, पहा काय म्हणाले? फडणवीस

| Updated on: Apr 24, 2023 | 1:26 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करणारे ट्विट केले आहे. यामुळे वाक युद्ध संपलं आणि ट्विटवार सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. फडणवीस यांनी राजकारणात पण कुस्ती... अशा तिनच शब्दात टीका केली आहे.

मुंबई : सध्याच्या राजकारणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करताना एक ट्विट केलं होतं. त्याच त्यांनी, महाराष्ट्राचे सध्याचे राजकारण.. खेचा खेची! फोडा फोडी! शेवटी.. शरणागती.. जय महाराष्ट्र! असे ट्विट केलं आहे. सोबत त्यांनी कबड्डीचा फोटो वापरला. त्यांच्या या ट्विटवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करणारे ट्विट केले आहे. यामुळे वाक युद्ध संपलं आणि ट्विटवार सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. फडणवीस यांनी राजकारणात पण कुस्ती… अशा तिनच शब्दात टीका केली आहे. यासोबत त्यांनी कुस्तीचा व्हीडिओ टाकला आहे. याच्या आधी फडणवीस यांनी, काही काहीजण सकाळी सकाळी 9 वाजता नशा करुन कुस्ती खेळतात असा टोला राऊत यांना लगावला. तर नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बाहेर व्हाव लागतं. तर जे असली मातीतले पैलवान असतात तेच कुस्ती जिंकतात असेही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.

Published on: Apr 24, 2023 01:26 PM