“टोळी गँगवॉरमध्ये मारली जाते किंवा…”, संजय राऊतांचं शिंदे गटावर निशाना

“टोळी गँगवॉरमध्ये मारली जाते किंवा…”, संजय राऊतांचं शिंदे गटावर निशाना

| Updated on: Jan 03, 2023 | 7:35 PM

शिंदे गट हा स्वत:ला टोळी मानत आहे. हे बरोबर आहे. कारण जागा वाटपात त्यांना एकही जागा नको आहे. प शिवसेना मात्र यापुढेही संघर्ष करत राहील. तर जितके दिवस शिंदे गट सत्तेचे आहे त्यात खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल असेही राऊत यावेळी म्हणाले

मुंबई : राज्यात शिंदे गटाने सत्ता काबिज केल्यानंतर आणि शिवसेनेत उभी फट पडल्यानंतर सतत आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या मिशन 44 वरून शिंदे गटाला डिवच्यानंतर पुन्हा एकदा टीका सुरू झाली आहे.
यावेळी संजय राऊत यांनी, शिंदे गटाला डिवचत, शिंदे गट म्हणजे टोळी आहे. आणि टोळी ही गँगवॉरमध्ये किंवा पोलीस एनकाऊंटरमध्ये मारली जाते असं म्हटलं आहे. त्याचबरोबर अशा टोळीला अस्तित्व नसतं असेही राऊत यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर शिंदे गट हा स्वत:ला टोळी मानत आहे. हे बरोबर आहे. कारण जागा वाटपात त्यांना एकही जागा नको आहे. प शिवसेना मात्र यापुढेही संघर्ष करत राहील. तर जितके दिवस शिंदे गट सत्तेचे आहे त्यात खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल असेही राऊत यावेळी म्हणाले
Published on: Jan 03, 2023 05:40 PM