चर्चेत राहण्यासाठी संजय राऊत बोलतात; शिवसेना नेत्याची टीका

चर्चेत राहण्यासाठी संजय राऊत बोलतात; शिवसेना नेत्याची टीका

| Updated on: Apr 01, 2023 | 1:00 PM

संजय राऊत यांना धमकी आलयाने राज्यात चांगलेच राजकारण तापले असून खळबळ उडाली आहे. यावरूनच शिवसेना नेते आणि छ. संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी, संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे

छ. संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई या पंजाबमधील खतरनाक गँगस्टरच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी आल्यानंतर राऊत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं आहे. तर हिंदूविरोधी असल्यामुळे मारून टाकू, दिल्लीमध्ये आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईप मारू.. लॅारेन्स के और से मॅसेज है….सलमान और तू फिक्स….तयारी करके रखना….’ असं या मॅसेजमध्ये म्हटलं आहे. त्यावरून आता राज्यात चांगलेच राजकारण तापले असून खळबळ उडाली आहे. यावरूनच शिवसेना नेते आणि छ. संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी, संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. भुमरे यांनी, संजय राऊतला कोणता मेसेज आला मी नाही बघीतला. पण मला एक सांगायचय की, संजय राऊत त्यांचं नाव चर्चेत राहावं म्हणून असा प्रयत्न नेहमीच करत असतात. याला धमकी दिली, त्यांना धमकी दिली…

Published on: Apr 01, 2023 01:00 PM