शिवसेनाप्रमुखांपेक्षाही मोठे झाल्याच्या अविर्भावात बोलू नका!; राऊतांवर शिरसाटांचा हल्ला

शिवसेनाप्रमुखांपेक्षाही मोठे झाल्याच्या अविर्भावात बोलू नका!; राऊतांवर शिरसाटांचा हल्ला

| Updated on: Apr 01, 2023 | 1:43 PM

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊत यांना आलेल्या धमकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, लोकप्रतिनिधी यांना धमक्या येत असतील तर त्यांना सुरक्षा मिळायला हवी असे म्हटलं आहे

छ. संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राज्यातील वातावरण गरम झाले आहे. यावरून राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर पत्रकारपरिषदेत जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गट, भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. यावरून राऊतांवर शिंदे गटाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तर विरोधकांनी त्यांना सुरक्षा देणं सरकारच काम असल्याचं म्हटलं आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी राऊत यांना आलेल्या धमकीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, लोकप्रतिनिधी यांना धमक्या येत असतील तर त्यांना सुरक्षा मिळायला हवी असे म्हटलं आहे. तर राऊत यांच्यावर निशाना साधत त्यांनी आपण शिवसेनाप्रमुखांपेक्षाही मोठे असल्याचा अविर्भाव आणत बोलू नये अशी टीका केली आहे. तर तुमच्या सारख्यांना धमकी येते म्हणत राऊत यांना डिवचले आहे.

Published on: Apr 01, 2023 01:43 PM