कलयुगातील शकुनीमामा; भाजप नेत्याचा राऊतांवर पलटवार; कोणी केली टीका?
राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावर राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची आठवण करत, पवारही आपली राजीनामा मागे घेतील असं म्हटलं होतं.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात गेल्या काही दिवसापासून शाब्दिक चकमक होत आहे. राऊत यांच्याकडून दररोज भाजपसह शिंद-फडणवीस सरकारवर टीका केली जाते. तर अनेक दावे आणि गोष्टीवर स्पष्टीकरण दिलं जात. तेच खोडून काढण्याचे काम हे नितेश राणे करताना दिसत आहेत. आजही राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावर राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याची आठवण करत, पवारही आपली राजीनामा मागे घेतील असं म्हटलं होतं. त्यावर नितेश राणे यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच राऊतांचा आधुनिक शकुनी मामा आहेस का असा एकेरी उल्लेख करत टीका केली आहे. यावेळी राणे यांनी, संजय राऊतसारखा माणूस घरात घेण्याच्या लायकीचा नाही. तो चपट्या पायाचा आहे. त्याच्यामुळे घराचं वातावरण खराब होतं. तर तो घरात भांडणं कशी लावायची हेच बघतो. त्याची यांवरच रोजीरोटी चालते. हेच काम त्याने आधी ठाकरे यांच्या घरात केलं आणि आता पवारसाहेबांच्या घरात करताना दिसतोय. पहिलं बाळासाहेबांचं घर तोडलं, आणि आता पवारसाहेबाचं. आधुनिक शकुनी मामा आहेस का तू?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.