राजकारणाचा दर्जा ढासळला; थुंकण्यावरून राजकारण चांगलच तापलं? कोणी बाप काढला तर कोणी….
राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर थुंकले. त्यानंतर परत ते श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच ऑन कॅमेरा थुंकले. यावरून जोरदार वादंग उठलं आहे. याचमुद्द्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे आणि शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे.
मुंबई : शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत फारच आक्रमक झाले आहेत. विविध मुद्द्यांवरून ते शिंदे गट आणि भाजपला घेरत असतात. याचदरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या दोन व्यक्तिंचे नाव आल्यानं जी कृती केली त्यावरून राज्यातील राजकारणाचा स्तर ढासल्याचे बोलले जात आहे. राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर थुंकले. त्यानंतर परत ते श्रीकांत शिंदेंचं नाव ऐकताच ऑन कॅमेरा थुंकले. यावरून जोरदार वादंग उठलं आहे. याचमुद्द्यावरून भाजप नेते आमदार नितेश राणे आणि शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. यावरून राणे यांनी थेट राऊत यांचा बाप काढत राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर गुलाबराव पाटील यांनी राऊत यांना एकेरीत 40 लोकांनी मतं दिली तेव्हा तू खासदार झालास, तू थुंकतो काय? पहिलं राजीनामा दे असं सुनावलं. तर संजय राऊत यांना फक्त मी एकटा दिसतोय. म्हणून ते थुंकायला लागला. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण मी कधी पाहिलं नव्हतं असं म्हणत या आधी कोणतेहीच राजकीय पक्ष फुटले नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.