चांगले प्रकल्प गुजरातला नेले जात असताना शेपूट घालून का बसला होतात? उद्धव ठाकरे यांचा संतप्त प्रश्न

चांगले प्रकल्प गुजरातला नेले जात असताना शेपूट घालून का बसला होतात? उद्धव ठाकरे यांचा संतप्त प्रश्न

| Updated on: May 06, 2023 | 3:19 PM

याचवळेला त्यांनी केंद्राला दिलेल्या पत्रावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना, मी मुख्यमंत्री असातना आता जे सुपारी घेऊन गद्दार फिरतायत त्याच गद्दारांनी सांगितलं होतं की बारसूतल्या ग्रामस्थांचा विरोध नाही. पण आता सगळं स्पष्ट होतंय.

रत्नागिरी : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी कोकणातील प्रकल्प विरोधी बारसू ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सूपारीबहाद्दरांनी इथं यावं आणि ग्रामस्थांसमोर प्रेझेंटेशन द्यावं अशी शिंदे गटावर टीका केली. तर ग्रामस्थांचा विरोध असेल तर शिवसेना म्हणून आपलाही विरोध असेल अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. याचवळेला त्यांनी केंद्राला दिलेल्या पत्रावरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना, मी मुख्यमंत्री असातना आता जे सुपारी घेऊन गद्दार फिरतायत त्याच गद्दारांनी सांगितलं होतं की बारसूतल्या ग्रामस्थांचा विरोध नाही. पण आता सगळं स्पष्ट होतंय. त्यामुळेच मी विरोध करतो. पण जेव्हा सगळे चांगले प्रकल्प गुजरातला जात होते तेव्हा हे शेपूट घालून का बसला होतात? असाही संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच आपल्या काळात वेदांत फॉक्सकॉन आणि एअरबस प्रकल्प गुजरातला का दिलात, चांगले प्रकल्प गुजरातला देण्यात आले. हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या आणि ते प्रकल्प पुन्हा महाराष्ट्राला द्या. चांगले प्रकल्प गुजरात आणि दिल्लीला दिले. विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राला दिले असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. प्रकल्प चांगला असेल आणि गावकऱ्यांचा पाठिंबा असेल तर आम्ही मध्ये येण्याचं कारण नव्हतं. ज्या अर्थी दडपशाही सुरु आहे. त्याअर्थी या प्रकल्पात काहीतरी काळंबेरं आहे असाही घणाघात त्यांनी केला आहे.

Published on: May 06, 2023 03:19 PM