ठाकरे-फडणवीस वादावर मनसे नेत्याची टीका; म्हणाले, स्थर घसरत...

ठाकरे-फडणवीस वादावर मनसे नेत्याची टीका; म्हणाले, स्थर घसरत…

| Updated on: Apr 05, 2023 | 12:12 PM

ठाण्यातील प्रकरणानंतर ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जहरी टीका करत एक अत्यंत फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभल्याचे म्हटलं होतं. त्यावरून राजकारण तापलेलं आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांसमोर आले आहेत

मुंबई : ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ठाण्यातील प्रकरणानंतर ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर जहरी टीका करत एक अत्यंत फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभल्याचे म्हटलं होतं. त्यावरून राजकारण तापलेलं आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांसमोर आले आहेत. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपसह उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधत टीका केली आहे. देशपांडे यांनी, राज्यातील राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे. टीका या राजकीय नसून वैयक्तिक होत चाललेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती लोप पावताना दिसत असल्याची टीका केली आहे. तर लोकांना याच्याशी काही देणं घेणं नाही. त्यांना राजकारणात काय सुरु आहे यात रस नाही असेही ते म्हणाले.

Published on: Apr 05, 2023 12:11 PM