राऊत यांच्या संगतीचा परिणाम, त्यामुळेच ‘तो’ शब्द...; शिंदे गटाच्या मंत्र्याकडून ठाकरे यांच्यावर खोचक टीका

राऊत यांच्या संगतीचा परिणाम, त्यामुळेच ‘तो’ शब्द…; शिंदे गटाच्या मंत्र्याकडून ठाकरे यांच्यावर खोचक टीका

| Updated on: Jul 12, 2023 | 3:41 PM

यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून आता टीका होताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकेर यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख कलंक असा झाला. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाकडून आता टीका होताना दिसत आहे. याचमुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना, त्यांच्याकडून कलंक हा शब्द संजय राऊत यांच्या संगतीमुळे बोलला गोला असावा असे म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे संयमी नेते आहेत. मात्र राऊत यांचे शब्द त्यांच्या कानावर पडल्यानेच कलंक असा उल्लेख फडणवीस यांचा केला असेही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. तर आता ज्या टीका होत आहेत. त्या ॲक्शनला रिॲक्शन येत आहेत असेही त्यांनी म्हटलं आहे. याबरोबरच त्यांनी सोमवारपासून मंत्रिमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच विस्तार व खाते वाटपाबाबत निर्णय घेतील असेही ते म्हणालेत.

Published on: Jul 12, 2023 03:41 PM