उद्धव ठाकरेंच्या नरेंद्र मोदींवरील ‘त्या’ टीकेवर भाजप संतप्त, बावनकुळे म्हणाले, 2024 येऊ द्या…
भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. तर याटीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करत मोदी घराणेशाहीबद्दल बोलतात, परंतु घराणेशाहीला एक परंपरा असते. तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाहीये. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय? अशी टीका केली होती. त्यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. तर याटीकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच मोदीजींच वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील. तर त्या वादळात कितीही मशाल लावा त्या विझणारच. तर मशाल कशी विझणार नाही बघू असा इशारा दिला आहे. त्यांच्या या बोचऱ्या टीकेवर संजय राऊत यांनी पलटवार करताना, आमच्या मशालीने आम्ही भाजपला खाक करून टाकू. आमची मशाल ही अमर ज्योत आहे आणि ती अशीच भडकत राहाणार असेही राऊत म्हणालेत.