‘नामर्द मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख’; रवी राणा यांची जीभ घसरली
मला असा वाटतं मुख्यमंत्री असताना जो माणूस काही करू शकला नाही, जो मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर लपून बसला, अमरावतीमध्ये जेव्हा बाळासाहेबांचे सच्चे शिवसौनिकांना बेड मिळत नव्हता, त्यांना औषध मिळत नव्हतं. त्यावेळी उद्धव ठाकरे फोन सुद्धा उचलत नव्हता.
अमरावती : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आज अमरावतीत सभा घेत शिंदे गट, भाजपसह नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी त्यावर आता पलटवार केला आहे. रवी राणा यांनी उद्धव ठाकरे हे चार वर्षानंतर पहिल्यांदा अमरावतीमध्ये पाव ठेवत आहेत. मला असा वाटतं मुख्यमंत्री असताना जो माणूस काही करू शकला नाही, जो मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर लपून बसला, अमरावतीमध्ये जेव्हा बाळासाहेबांचे सच्चे शिवसौनिकांना बेड मिळत नव्हता, त्यांना औषध मिळत नव्हतं. त्यावेळी उद्धव ठाकरे फोन सुद्धा उचलत नव्हता. तेव्हा त्यांना शिवसैनिकांच्या आठवण आली नाही. मग आता चार वर्षानंतर त्यांना अमरावती आणि शिवसैनिकांची कशी आठवण आली. आता कसे ते बाहेर पडले? ही त्यांची मजबूरी आहे. हनुमान चालीसा प्रकरणात एक महिला खासदाराला आणि आमदाराला घरामध्ये अटक केली. त्यामुळे त्यांची नामर्द मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ओळख तेव्हा निर्माण झाल्याची टीका केली आहे.